Course Outcomes
बी.ए. भाग एक
 आवश्यक अनुषंगिक निवड : मराठी अभ्यासपत्रिका 
सत्र : 1 आणि 2 - पाठ्यपुस्तक : शब्दसंहिता 
 • विद्यार्थ्यांची मराठी भाषा आणि साहित्याविषयी अभिरुची विकसित झाली. 
 • मराठी साहित्य परंपरा, लेखक, कवी यांचा परिचय झाला .  
 • विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव निर्माण झाली. 
 • विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून विविध परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी झाली. 
 • निबंधलेखनाच्या माध्यमातून भाषा उपयोजनाची कौशल्ये विकसित झाली. 
Course Outcomes 
बी.ए. भाग एक
विद्याशाखीय विशेष गाभा : मराठी अभ्यासपत्रिका – 1 आणि 2  
 पाठ्यपुस्तक : अक्षरबंध 
 • विद्यार्थ्यांची मराठी भाषा आणि साहित्याविषयी अभिरुची विकसित झाली.  
 • मराठी साहित्य परंपरा, लेखक, कवी यांचा परिचय झाला.  
 • विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव निर्माण झाली. 
 • विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून विविध परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी झाली. 
 • विविध प्रसारमाध्यमांच्या लेखन आणि उपयोजनाच्या आकलनाचा अवकाश वाढला. 
Course Outcomes 
बी.ए. भाग दोन 
मराठी: अभ्यासपत्रिका क्र. 3 आणि 5 (गद्य) 
 • मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा व भाषेचा परिचय झाला. 
 • अनुवादप्रक्रियेचा परिचय झाला. 
 • समकालीन जाणिवा व्यक्त करणा-या कथांचा परिचय झाला. 
Course Outcomes 
बी.ए. भाग दोन 
मराठी: अभ्यासपत्रिका क्र. 4 आणि 6 (गद्य) 
 • मध्ययुगीन मराठी वाडमयाचा, भाषेचा परिचय झाला. 
 • संपादनप्रक्रियेचा परिचय झाला. 
 • समकालीन जाणिवा व्यक्त करणा-या कवितेचा परिचय झाला. 
Course Outcomes
बी.ए. भाग तीन
मराठी: अभ्यासपत्रिका क्र. 7 आणि 12 
काव्यशास्त्र 
 • पौर्वात्य काव्यशास्त्राची ओळख झाली. 
 • काव्याची लक्षणे आणि प्रयोजने समजली. 
 • साहित्याची निर्मितीप्रक्रिया आणि स्वरुप समजले. 
 • भाषेचे अलंकार समजले. 
 • शब्दशक्तीचे स्वरुप व प्रकार समजले. 
 • रसप्रक्रिया समजली. 
 • साहित्याची आस्वादप्रक्रिया समजली. 
 • साहित्यनिर्मितीच्या आणि आस्वादाच्या आनंदाची मीमांसा लक्षात आली. 
 • विद्यार्थ्यांचा वाडमयीन दृष्टिकोण विकसित झाला. 
Course Outcomes
बी.ए. भाग तीन
मराठी: अभ्यासपत्रिका क्र. 8 आणि 13 
भाषाविज्ञान आणि मराठी भाषा 
 • आधुनिक भाषाविज्ञानाचा परिचय करुन दिला. 
 • भाषाविज्ञान आणि मराठी भाषा यांचा सहसंबंध लक्षात आला. 
 • भाषेची उत्पत्ती, स्वरुप, कार्य समजले. 
 • ध्वनिपरिवर्तनाची कारणे व प्रकारांची माहिती झाली. 
 • मराठी भाषेची वर्णव्यवस्था समजावून सांगितली. 
 • मराठी भाषेबद्दलची विद्यार्थ्यांची आवड विकसित झाली. 
 • अर्थपरिवर्तनाच्या कारणांची व प्रकारांची माहिती झाली. 
 • मराठीचा उगमकाळ व तिच्या जनकभाषेविषयी माहिती झाली. 
 • मराठीची शब्दव्यवस्था ( शब्दांच्या जाती) समजली. 
 • मराठी भाषेविषयीची विद्यार्थ्यांची आवड विकसित झाली. 
Course Outcomes
बी.ए. भाग तीन
मराठी: अभ्यासपत्रिका क्र. 9 आणि 14
मराठी वाडमयाचा इतिहास 
 • मध्ययुगीन मराठी वाडमय परंपरांचा व इतिहासाचा परिचय झाला. 
 • या कालखंडातील वाड्मय रचनाप्रकारांचा परिचय झाला. 
 • या कालखंडातील वाडमयनिर्मितीच्या प्रेरणांचा परिचय झाला. 
 • या कालखंडातील वाडमयाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा उलगडा झाला. 
 • या कालखंडातील प्रमुख संप्रदाय व ग्रंथनिर्मिती यांचा अनुबंध स्पष्ट झाला. 
 • या काळातील मराठी भाषेचे स्वरुप स्पष्ट झाले. 
Course Outcomes
बी.ए. भाग तीन
मराठी: अभ्यासपत्रिका क्र. 10 आणि 15 
मराठी भाषा : उपयोजन आणि सर्जन 
 • औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रानुसार भाषिक व्यवहार समजला. 
 • विविध क्षेत्रातील भाषिक कौशल्ये आणि क्षमता विकसित झाल्या. 
 • लेखन, वाचन, भाषण या कौशल्यांचा विकास झाला. 
 • उपयोजित व सर्जनशील लेखनास विद्यार्थी उद्युक्त झाले. 
 • मराठीच्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास झाला.
 • भाषिक उपयोजनाने विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह समृद्ध झाला. 
 • मुलाखत, संपादन, परीक्षण अशा भाषिक आकृतिबंधांचा परिचय झाला. 
 • जनसंपर्क कौशल्याची आवश्यकता व तंत्रे समजली. 
Course Outcomes
बी.ए. भाग तीन
मराठी: अभ्यासपत्रिका क्र. 11 आणि 16
वाडमयप्रवाहांचे अध्ययन

मराठीतील विविध साहित्यप्रवाहांचा परिचय झाला. 
ग्रामीण साहित्यप्रवाहांची प्रेरणा, स्वरुप, वैशिष्ट्ये व विकास समजला. 
दलित साहित्यप्रवाहांची प्रेरणा, स्वरुप, वैशिष्ट्ये व विकास समजला. 
अभ्यासार्थ नेमलेल्या साहित्यकृतीद्वारे संबंधित साहित्यप्रवाहाचे आकलन झाले. 

Programme Outcomes (PO) – MARATHI 

पत्रकारिता : मराठी भाषेतील विविध भाषिक कौशल्यांच्या माध्यमातून पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्द्ध आहेत. पत्रकारिता हे एक प्रभावी माध्यम असून वेगवेगळ्या भाषेतील वृत्तपत्रे, मासिके, प्रकाशन संस्था, रेडीओ, वेब पोर्टल, यू ट्यूब चॅनेल इत्यादी ठिकाणची वाढती मागनी लक्षात घेता पत्रकारितेतील करिअर हा उत्तम मार्ग आहे. संपादक, उपसंपादक, सहसंपादक, वार्ताहर, आवृत्ती प्रमुख, व्यवस्थापक, मुक्त पत्रकार, जाहिरात अधिकारी, प्रकाशन अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, माहिती अधिकारी, वृत्तवाहिनी वार्ताहर, वाहिनी अ‍ॅंकर, टी,व्ही. निवेदक, नभोवाणी निवेदक, प्राध्यापक इत्यादी विविध पदांवर काम करता येते. 
अनुवादाचे क्षेत्र : आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अनुवाद हा करिअरचा खूप मोठा पर्याय आहे. भाषेचा जाणीवपूर्वक अभ्यास करुन विविध भाषांवर प्रभुत्व मिळवणा-यांना अनुवादक म्हणून करिअर करण्याची मुबलक संधी . 
कार्पोरेट जगत, राष्ट्रीय पातलीवरील राजकीय संस्था तसेच सामाजिक संस्थांच्या जाहिरातीआणि निवेदने, विविध वेबसाईटवर, पर्यटन कंपन्या, मोठी हॉटेल्स, विविध देशांचे दूतावास, बहुराष्ट्रीय कंपन्या, कार्पोरेट हाऊसेस, केंद्र सरकारच्या काही विभागांमध्ये, वृत्तपत्रे, न्यायालयीन कामकाज, आयात-निर्यात क्षेत्र अशा विविध ठिकाणी उत्तम अनुवादकांना खूप संधी उपलब्ध आहे. 

 • स्पर्धा परीक्षा : या प्रशासकीय सेवांशी निगडित असल्या तरी प्रशासनाचा थेट संबंध देशाशी संबंधित असलेल्या विविध क्षेत्रांमध्ये संधी. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी म्हणजे स्पर्धा परीक्षा. राजभाशेतून प्रशासन चालवण्याच्या धोरणात्मक निर्णयानंतर प्रशासनिक कौशल्यांबाबत मराठीतून अनेक कामे निर्माण झाली आहेत. 
 • प्रशासन क्षेत्र : विविध विषयांवरील  जगभरातील भाषांमधील पुस्तके मराठीमध्ये आणण्याची मोठी स्पर्धा सुरु आहे. लेखन, अनुवादक, प्रकाशक, वितरक या सर्वांना रोजगार उपलब्द्ध आहे. 
 • माध्यमांमध्ये संधी : बातम्यांचे अनुवाद, मालिकांचे लेखन, जाहिरात लेखन, संवाद, अशी विविध कामे विविध चॅनेल्सवर तसेच रेडीओवर करण्याची संधी मराठी भाषेशी संबंधित रोजगार उपलब्ध करुन देण्याची संधी माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. 

सूत्रसंचालन : सूत्रसंचालन ही एक कला तसेच ते एक शास्त्र आहे. भाषेवर प्रभुत्व असेल आणि आवाजाची देणगी असल्यास या क्षेत्रामध्ये सुद्धा आज फार मोठी संधी आहे. पूर्वी सूत्रसंचालक म्हणजे वेळ मारुन नेणारा अशी दुय्यम भूमिका असे. पण आज सूत्रसंचालक म्हणजे कार्यक्रमाचा प्राण असे मानले जाते. कार्यक्रम रंगवत नेण्याची कला ज्याच्याकडे आहे त्याला ही फार मोठी संधी आहे. आज अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमालासुद्धा सूत्रसंचालक हा असतो असतो. 

 • प्रकाशन व्यवसाय : मराठी पुस्तकांची निर्मिती करणा-या प्रकाशवयवसायात आज खूप संधी आहे. मराठी प्रकाशनाच्या क्षेत्रात आज अपेक्षेपेक्षा त्वरेन बदल होत आहेत. मराठी भाषेचे ज्ञान, संगणकाशी मैत्री या दोन भांडवलावर आज येथे नोकरीची संधी निश्चितपणे आहे. मराठी व्याकरणाचा पाया पक्का हवा आणि मुद्रित शोधनाचे नियम माहित हवेत. या दोन गोष्टींमुळे या क्षेत्रात पाय रोवणे शक्य झाले आहे. लेखन, संपादन, मुद्रित शोधन, टायपिंग, प्रकाशकअशा विविध संधींचे दार खुले असल्यामुळे या क्षेत्राचा जरुर विचार करावा लागतो.