रत्नागिरी येथे आज झालेल्या 19 वर्षाखालील शालेय शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धेत डी.आर.माने महाविद्यालयाच्या ज्युनिअरच्या मुलांच्या संघाने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात सातारा जिल्ह्मावर एकतर्फी मात करत विजय मिळवला. सदर संघांची जळगाव येथे होणाऱ्या राज्यतरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.तसेच हातकणंगले येथे आजच झाले ल्या सिनियर महाविद्यालयाच्या मुलीच्या व्हाँलिबाँल संघाने झोनल स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त केला सदर संघाची इंटर झोनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे सदर संघास संस्थेचे सचिव प्रताप (भैय्या) माने, कॅम्पस डायरेक्टर डॉ.प्रवीण चौगले, प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांचे प्रोत्साहन तर डॉ. श्रीनिवास पाटील, श्री. चंद्रकांत कासोटे, प्रा. संग्राम तोडकर, श्री. प्रताप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.