D R Mane College, Kagal

Estd. 1984

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S

D. R. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL

Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)

Arts, Commerce, Science, BCA & M.Com

Re-Accredited By:

NAAC ‘B+’

Re-Accredited By:

NAAC ‘B’

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S
DR. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL
Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)
Arts, Commerce, Science, BCA & M.Com

डी. आर. माने महाविद्यालयात पालक सभेचे आयोजन

कागल : डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथील बीएससी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील विद्यार्थ्यांच्या पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेस पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नियमित उपस्थिती, अभ्यासातील अडचणी, महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली.

सभेत पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत तसेच महाविद्यालयीन उपक्रमांबाबत विविध सूचना व मते मांडली. महाविद्यालय प्रशासन, शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही सभा उपयुक्त ठरली.

सभेस महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार कदम सर,कॅम्पस डायरेक्टर प्रवीण चौगुले, बीएससी कॉर्डिनेटर तोसिफ नदाफ, प्रा. रेश्मा निडूनी , प्रा.पार्वती शिंगे विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन बीएससी विभागाच्या वतीने करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तनुजा आगळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. पार्वती शिंगे यांनी केले.

Scroll to Top