D R Mane College, Kagal

Estd. 1984

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S

D. R. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL

Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)

Arts, Commerce, Science, BCA & M.Com

Re-Accredited By:

NAAC ‘B+’

Re-Accredited By:

NAAC ‘B’

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S
DR. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL
Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)
Arts, Commerce, Science, BCA & M.Com

डी. आर. माने महाविद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कागल :– दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विरेंद्र प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी वंदे मातरम, राष्ट्रगीत गायन करून सर्वांनी ध्वजाला मानवंदना दिली. तसेच सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थिनींनी जय जय महाराष्ट्र माझा, ये देस मेरे या गीतांचे सादरीकरण केले. तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाकडील प्रा. हृषीकेश सानप यांनी सतार वादनाद्वारे सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा गीत सादर केले.

या प्रसंगी एन.सी.सी विभाग प्रमुख कॅप्टन प्रा. डॉ. संतोष जेठीथोर यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी कॅडेट्स नी शिस्तबद्ध संचलन करून मानवंदना दिली.

या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना, “विकसित भारताचे सुजान नागरिक आणि आपली जबाबदारी” याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी “शिक्षण, रोजगार, ज्ञान आणि सुरक्षा यांचे आपल्या जीवनातील महत्त्व” प्रतिपादन केले. तसेच त्यांनी (AI) कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विवेकाने करून देशाचा विकास करावा असे आवाहन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top