
कागल :- दि.26/01/2026 कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांच्या उपस्थितीत २०२६ या सालामध्ये निवृत्त होणारे महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक श्री. बाबुराव पुंडे तसेच प्रा. संभाजी पाटील, प्रा. जी. एन. भोसले, प्रा. लतिका सावेकर या प्राध्यापकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संविधान वाचन डॉ. लखन भोगम यांनी केले. तर राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत गायनाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कॅप्टन डॉ. संतोष जेठीथोर यांच्या मार्गदर्शनाखाली एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी संचलन परेड करून तिरंग्याला सलामी दिली. सदर एन. सी. सी. च्या पथकाचे नेतृत्व कु. माधुरी चव्हाण या विद्यार्थिनीने केले. तसेच एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी युद्धभूमीवरील वास्तव महाविद्यालयाच्या मैदानावर नाट्य रूपाने सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पल्लवी कुंभार या विद्यार्थिनीने केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रा. बिपिन माने उपस्थित होते. त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांनीही आपल्या मनोगतातून एन. सी. सी. च्या इंडियन आर्मीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून तरुणाईने देशाची सेवा करणे हे आपले पहिले कर्तव्य मानले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री. प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष श्री. सुनील माने तसेच महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी गुरुप्रसाद वारनूळकर (BSF), रोहित जत्राटे (AMC),एन सी सी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. संतोष जेठीथोर, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास पाटील, प्रा. संग्राम तोडकर, विविध विभागातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, एन. सी. सी, एन. एस. एस. चे सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.