D R Mane College, Kagal

Estd. 1984

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S

D. R. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL

Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)

Arts, Commerce, Science, BCA & M.Com

Re-Accredited By:

NAAC ‘B+’

Re-Accredited By:

NAAC ‘B’

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S
DR. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL
Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)
Arts, Commerce, Science, BCA & M.Com

डी. आर. माने महाविद्यालयात सचेतना मंडळ व सखी सावित्री मंचच्या वतीने मेहंदी व रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न.

कागल:- दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथील सचेतना मंडळ व सखी सावित्री मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मेहंदी व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांच्या हस्ते सदर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी “विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक पातळीवरील ज्ञान उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन केले.” तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याचे कौशल्य आत्मसात करण्यास मदत होत असल्याचे विवेचन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचेतना मंडळाच्या प्रमुख प्रा. शर्मिला पाटील यांनी केले. वर्षभर विद्यार्थीनींसाठी राबविण्यात येणाऱ्या स्पर्धांचा आढावा त्यांनी घेतला. याप्रसंगी कनिष्ठ विभागाकडील प्रा. अश्विनी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी, “महाविद्यालयात अशा स्पर्धा वारंवार आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा आणि त्यांच्यातील कलाकाराला एक योग्य व्यासपीठ मिळवून द्यावे” असे आवाहन केले.

या उद्घाटन सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे आय. क्यू. ए. सी. विभाग प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ गाडे, प्रा. सोमलिंग तेली, प्रा. अमरसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमासाठी विज्ञान विभागाकडील सखी सावित्री मंच प्रमुख प्रा. अश्विनी संकपाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना डोणे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. काजल जाधव यांनी मानले.

मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजीच्या उद्घाटन सत्रानंतर विद्यार्थिनींनी मेहंदी काढून आपली कला सादर केली. वैविध्यपूर्ण आणि रेखीव अशा कलाकुसरीने ही मेहंदी स्पर्धा संपन्न झाली.

तसेच बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या खुल्या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय विषयावर आधारित प्रबोधनपर अशा रांगोळी काढून स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापिकांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पूर्ण करून स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी विशेष सहकार्य केले. तसेच संपूर्ण कार्यक्रमाच्या छायाचित्रणाचे काम विवेक गिरी यांनी केले.

या स्पर्धेसाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने, परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले, प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top