



कागल:– दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथील मानसशास्त्र विभागाच्यावतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सविता रेवडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांनी मानसिक आरोग्याविषयी मनोगत व्यक्त करताना, “मनमोकळेपणाने सुसंवाद साधणे, व्यसन टाळणे आणि सकारात्मक विचार करणे. समाजातील व्यक्तीबाबत सहानुभूती व संवेदनशीलता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.” असे प्रतिपादन केले.
सदर पोस्टर्समधून मानसिक आरोग्याची लक्षणे, कारणे, निदान, उपचार तसेच सामाजिक – भावनिक आधार आणि मदत मागण्याचे महत्त्व या विषयावर प्रभावी मांडणी केली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच मन निरोगी ठेवण्यासाठी संवाद साधा, आधार द्या, साथ द्या आणि आयुष्य सुंदर बनवा असा सकारात्मक संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उमा सावंत यांनी केले तर आभार प्रा. योगिता रेवडे यांनी मानले.
सदर कार्यक्रमावेळी आय. क्यू. ए. सी. विभाग प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ गाडे, हिंदी विभाग प्रमुख प्रा. हसीना मालदार यांच्यासह विविध विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले, प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.