D R Mane College, Kagal

Estd. 1984

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S

D. R. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL

Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)

Arts, Commerce, Science, BCA & M.Com

Re-Accredited By:
NAAC ‘B’

Re-Accredited By:

NAAC ‘B’

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S
DR. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL
Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)
Arts, Commerce, Science, BCA & M.Com

अर्थशास्त्र विभागांतर्गत  बँक ऑफ बडोदा व के. डी. सी. बँक कागल बँकांना भेट

अर्थशास्त्र विभागांतर्गत  बँक ऑफ बडोदा व के. डी. सी. बँक कागल बँकांना भेट

दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालय, कागल. अर्थशास्त्र विभाग विभागांतर्गत आयोजित ‘ बँक ऑफ बडोदा तसेच के. डी. सी. बँक कागल या दोन्हीही बँकांना दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी भेट दिली.

बँक भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना बँकिंग कामकाजाबद्दल व्यावहारिक ज्ञान देणे आणि बँकिंग प्रणालीचे कार्य समजून घेणे हा होता.बँक अधिकाऱ्यांनी बँकेद्वारे ऑफर केलेल्या विविध प्रकारच्या खाती, सेवा आणि उत्पादनांचे स्पष्टीकरण दिले.

विद्यार्थ्यांना खाते उघडणे, पैसे जमा करणे आणि काढणे आणि कर्जासाठी अर्ज करणे यासारख्या बँकिंग प्रक्रियांबद्दल ज्ञान मिळाले. ऑनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंगसह बँकेच्या डिजिटल बँकिंग सुविधांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

विद्यार्थ्यांनी बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि बँकिंग कामकाजाबद्दल, त्याचबरोबर बँकिंग परीक्षेबाबत माहिती विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँक व को-ऑपरेटिव्ह बँक यामधील फरक हा प्रत्यक्षरीत्या योग्य पद्धतीने अनुभव घेता आला.

तसेच या कार्यक्रमाचे नियोजन करण्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम सर आणि महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले सर , IQAC प्रमुख डॉ. आदिनाथ गाडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी – विद्यार्थिनी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सहभागी झाले होते.

Scroll to Top