
कागल :- दि.19-01-2026 कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालय कागल, मराठी विभाग आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रविण चौगले यांनी केले. सदर उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम, IQAC विभाग प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ गाडे, कार्यालयीन अधिक्षक (OS) श्री. बाबुराव पुंडे उपस्थित होते.
मराठी भाषा जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदर रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठीच्या बोली, मराठी संत परंपरा अशा विविध विषयावरती विद्यार्थ्यांनी रांगोळी कला प्रदर्शित केली. सदर रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. सारिका सदाशिव मिसाळ (बी. ए. भाग २) द्वितीय क्रमांक विभागून कु. श्रावणिका संतोष घोरपडे (बी. कॉम. भाग ३ ) व कु. सुस्मिता सुधाकर लोहार (बी. कॉम. भाग ३ ), तृतीय क्रमांक कु. प्रियांका अनिल मळगे (११ वी. कॉमर्स) आणि उत्तेजनार्थ क्रमांक कु. नुतन पोपट खोत (११वी कॉमर्स) या विद्यार्थिनींनी सदर रांगोळी स्पर्धेत यश संपादन केले आहे.
सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. लतिका सावेकर आणि प्रा. पूजा पाटील यांनी काम पाहिले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक प्रा. शर्मिला पाटील यांनी केले तर आभार प्रा. संदिप वाडीकर यांनी मानले.
याप्रसंगी रांगोळी स्पर्धा संयोजन समिती प्रमुख प्रा. शिल्पा कुंभार यांनी काम पाहिले. तर स्पर्धा संयोजन समिती सहाय्यक म्हणून प्रा. आश्विनी घाटगे, प्रा. बाळासाहेब कांबळे यांनी सहकार्य केले.
या स्पर्धेसाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री. प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष मा. श्री. सुनील माने, प्रा. बिपिन माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.