
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने डी.आर. माने महाविद्यालय येथे ग्राहक जागृती विषयक भित्तिपत्रक व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.नंदकुमार कदम सर होते. श्री.योगेश कदम (अखिल भारतीय ग्राहक पंचायत,कागल तालुका अध्यक्ष ) व श्री. प्रशांत दळवी (अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कागल शहर कोषाध्यक्ष) यांनी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना ग्राहकांचे हक्क व त्याविषयी तक्रारी याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाकरिता कॉमर्स विभागातील प्रा. काळुगडे, प्रा.मोगणे, प्रा. अंजली पाटील, प्रा.नढाळे, प्रा. सावंत यांनी विशेष श्रम घेतले.