
दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालय, कागल. मराठी विभाग आयोजित ‘वाचनकट्टा’ हा कार्यक्रम आज बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या महाविद्यालयामध्ये संपन्न झाला.
वाचन संस्कृती जपावी आणि ग्रंथांचे व मराठी भाषेचे मानवी जीवनातील स्थान अधोरेखित व्हावे. वेगवेगळ्या साहित्यकृतींची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. शर्मिला पाटील यांनी ‘मी वनवासी’ या सिंधुताई सपकाळ यांच्या आत्मकथनपर ग्रंथाचे परीक्षण केले तर बी. ए. भाग दोन ची विद्यार्थिनी कु. तन्वी माळी हिने ‘मलाला’ या ऋतुजा बापट – काणे यांनी अनुवादित केलेल्या ग्रंथाचे परीक्षण केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी IQAC विभाग प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ गाडे सर होते. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम सर आणि महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख या पदाचा कार्यभार सांभाळणारे प्रा. संदीप वाडीकर यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. शिल्पा कुंभार यांनी केले तर आभार प्रा. बाळासाहेब कांबळे यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. पूजा पालकर मॅडम, तसेच प्रा. जयमाला पाटील मॅडम, प्रा. तेजस्विनी शितोळे मॅडम, महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.