
कागल:– दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे वाणिज्य विभाग आयोजित कंपनी सेक्रेटरीविषयी मार्गदर्शक कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
“कंपनी सेक्रेटरी हे एक रोजगाराचे उत्तम क्षेत्र आहे. कोणत्याही शाखेचा किमान १२ वी. उत्तीर्ण विद्यार्थी हा कंपनी सेक्रेटरी कोर्ससाठी पात्र ठरतो. कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यास वेगवेगळ्या स्तरांवर परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. कंपनी सेक्रेटरी हा कंपनी बोर्ड ऑफ डायरेक्टर, भागधारक व रेग्युलेटरी अथॉरिटीच्या मध्ये एक महत्त्वपूर्ण कडी आहे.” असे प्रतिपादन प्रमुख वक्ते सी.एस. स्वप्नील पाटोळे (चेअरमन कोल्हापूर चॅप्टर) यांनी केले. तसेच सी.एस. सचिन बिडकर यांनी कंपनीमध्ये सेक्रेटरीची कामे आणि सेक्रेटरी म्हणून उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या अनेक संधी याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.
तसेच “अशा कार्यशाळेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपले भविष्य घडवावे” असे प्रतिपादन महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले यांनी केले.
सदर कार्यशाळेसाठी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शाखेतील करिअरच्या संधी आणि त्याबद्दलची दूरदृष्टी याविषयी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी वाणिज्य विभागाकडील प्रा. राजेंद्र मोगणे, प्रा. प्रदिप काळुगडे, प्रा. राजेश नढाळे, प्रा. अंजली पाटील, प्रा. अतुल वारके आणि विविध विभागातील प्राध्यापक, वाणिज्य विभागातील विद्यार्थी – विद्यार्थिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यशाळेसाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.