D R Mane College, Kagal

Estd. 1984

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S

D. R. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL

Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)

Arts, Commerce, Science, BCA & M.Com

Re-Accredited By:
NAAC ‘B’

Re-Accredited By:

NAAC ‘B’

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S
DR. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL
Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)
Arts, Commerce, Science, BCA & M.Com

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ संपन्न झाला

डी आर माने महाविद्यालय कागल येथे आज शनिवार दिनांक 30/1/2026 रोजी  इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ संपन्न झाला

सालाबाद प्रमाणे सांस्कृतिक  विभागा अंतर्गत इयत्ता बारावी कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा/ शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये  सुमारे 25 विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांविषयी त्यांच्या मनामध्ये असणारे आदराचे स्थान, त्यांच्याकडून  घेतलेली

ज्ञानाची शिदोरी जी त्यांना आयुष्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये मदत करणार आहे याच्या विषयी ते भरभरून बोलले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर नंदकुमार कदम सर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच आपल्याच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना आवाहन केले. कनिष्ठ विभागाची समन्वयक पदाची धुरा सांभाळणारे प्राध्यापक तेली सर यांनी परीक्षेविषयी अत्यंत महत्त्वाच्या सूचना मुलांना दिला अकरावी व एफ वाय बी ए बीकॉम च्या प्रवेशाविषयी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच प्राध्यापक घाटगे मॅडम, प्राध्यापक पन्हाळकर मॅडम प्राध्यापक भोसले सर यांनी आपले विद्यार्थ्यांच्या विषयी असणारे मनोगत व्यक्त  करत बारावी बोर्ड परीक्षेसाठी व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  सांस्कृतिक विभाग (कनिष्ठ ) प्रमुख. प्राध्यापक सविता पन्हाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक लतिका सावेकर यांनी मांडले तसेच सूत्रसंचालन प्राध्यापक अर्चना डोने यांनी केले. या कार्यक्रमास इयत्ता बारावी कला व वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थी नटून थटून हजर होते.तसेच जुनियर विभागातील प्राध्यापक आवटे सर, प्राध्यापक हजारे सर प्राध्यापक रजपूत सर,  प्राध्यापक नलवडे सर, प्राध्यापक पूजा पाटील मॅडम, सीनियर विभागातील प्राध्यापक रणजीत  पाटील सर,प्राध्यापक अंजली तोडकर मॅडम, प्राध्यापक मोगणे  सर, प्राध्यापक संध्या सावंत मॅडम व इतर प्राध्यापक हजर होते.

Scroll to Top