D R Mane College, Kagal

Estd. 1984

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S

D. R. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL

Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)

Arts, Commerce, Science, BCA & M.Com

Re-Accredited By:

NAAC ‘B+’

Re-Accredited By:

NAAC ‘B’

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S
DR. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL
Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)
Arts, Commerce, Science, BCA & M.Com

डी. आर. माने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ आयोजित ४६ वा युवा महोत्सव गाजवला

कागल:– दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आणि जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४६ व्या युवा महोत्सव स्पर्धेत लोककला या कलाप्रकारात उत्तम प्रकारे सादरीकरण करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. तसेच मराठी, हिंदी वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा अशा विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सादरीकरण विशेष उल्लेखनीय आहे. सदर स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोककला या कला प्रकारात तृतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हसीना मालदार, प्रा. संदिप वाडीकर, डॉ. सरस्वती गायकवाड, डॉ. शिल्पा कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच नृत्य दिग्दर्शक म्हणून शुभम सोनुले आणि नितेश साठे यांनी काम पाहिले.

सदर स्पर्धेसाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले, प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top