


कागल (प्रतिनिधी) : दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्रा. (डॉ.) सुषमा चौगले (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर) यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. “ग्रंथ हे ज्ञान व संस्काराचे केंद्र असून ते इतिहासातून वर्तमानाचा आविष्कार साधत आपले भविष्य उज्ज्वल करतात,” असे प्रतिपादन त्यांनी केले. विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमासाठी IQAC विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) आदिनाथ गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल पूजा पालकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शुभांगी बिरंबोळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शर्मिला पाटील यांनी केले, तर आभार प्रा. अपूर्वा लोकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अरुण कुंभार व छायाचित्रकार विवेक गिरी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी दि कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने व संचालक प्रा. बिपिन माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम, परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


