


कागल:- दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालय, कागल कनिष्ठ व वरिष्ठ वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाविद्यालयीन अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक कनिष्ठ विभागाकडील वक्तृत्व व निबंध स्पर्धा समन्वयक प्रा. अश्विनी घाटगे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सदर स्पर्धेचा हेतू प्रतिपादन केला. तसेच विद्यार्थ्यांना पु. ल. देशपांडे, आचार्य प्र. के. अत्रे यासारख्या दिग्गज लेखकांच्या वक्तृत्वाची महती सांगून नव्याने ओळख करून दिली. तसेच संघर्षातून माणूस कसा घडतो याविषयी प्रतिपादन करून स्पर्धकांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांनी, “विद्यार्थ्यांनी अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या मधील कलागुण व्यक्त करावे, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालय आणि महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद सदैव सज्ज असल्याचे विवेचन केले.” तसेच त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आय. क्यू. ए. सी. विभाग प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ गाडे, कनिष्ठ विभागाकडील प्रा. अमरसिंह रजपूत, प्रा. एस. एन. तेली यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर वक्तृत्व स्पर्धेसाठी कनिष्ठ विभागाकडील एकूण १७ व वरिष्ठ विभागाकडील एकूण ५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कनिष्ठ विभागासाठी प्रा. रामकृष्ण हांडे, प्रा. अर्चना डोणे, वरिष्ठ विभागासाठी प्रा. तेजस्विनी शितोळे, प्रा. शर्मिला पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. सरस्वती गायकवाड व डॉ. शिल्पा कुंभार यांनी केले. तर आभार वक्तृत्व स्पर्धा समितीच्या प्रमुख प्रा. दर्शना विभुते यांनी मानले. या स्पर्धेसाठी वक्तृत्व विभागातील प्रा. बाळासाहेब कांबळे, सांस्कृतिक विभागातील प्रा. ऋषिकेश सानप उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी–विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर वक्तृत्व स्पर्धेसाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.