D R Mane College, Kagal

Estd. 1984

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S

D. R. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL

Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)

Arts, Commerce, Science, BCA & M.Com

Re-Accredited By:
NAAC ‘B’

Re-Accredited By:

NAAC ‘B’

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S
DR. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL
Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)
Arts, Commerce, Science, BCA & M.Com

भूगोल विभाग-क्षेत्र सर्वेक्षण प्रकल्प

भूगोल विभाग-क्षेत्र सर्वेक्षण प्रकल्प

भूगोल विभागाच्या वतीने मंगळवार, दि. १०/०२/२०२६ रोजी क्षेत्र सर्वेक्षण प्रकल्प अंतर्गत “कागल शहरातील गोसावी समुदायाची सामाजिक-आर्थिक स्थिती आणि सक्षमीकरण : एक भौगोलिक अभ्यास”

या विषयावर क्षेत्र सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या क्षेत्र सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश कागल शहरातील गोसावी समुदायाची सामाजिक, शैक्षणिक स्थिती, आर्थिक उपजीविकेची साधने, निवास व्यवस्था, आरोग्य सुविधा, तसेच शासकीय योजनांचा लाभ आणि सक्षमीकरणाच्या संधी यांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे हा होता. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात भेट देऊन प्रश्नावली, संवाद, निरीक्षण व माहिती संकलन या पद्धतींचा अवलंब केला.या सर्वेक्षणादरम्यान गोसावी समुदायाच्या परंपरागत व्यवसायांमध्ये होत असलेले बदल, रोजगाराच्या नव्या संधी, शिक्षणातील वाढती जाणीव, महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया तसेच सामाजिक-आर्थिक अडचणी याबाबत सखोल माहिती संकलित करण्यात आली. समुदायातील नागरिकांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करून प्रत्यक्ष अनुभव व माहिती दिली. सदर क्षेत्र सर्वेक्षणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) नंदकुमार कदम यांनी मार्गदर्शन केले. भूगोल विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) आदिनाथ गाडे यांनी या प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना दिशा दिली. या प्रसंगी प्रा. विनायक माळी-जाधव व डॉ. सरस्वती गायकवाड,  हे उपस्थित होते. या सर्वेक्षणासाठी शिक्षकेतर कर्मचारी श्री. सुरेश मकवाणी यांनी आवश्यक सहकार्य केले, तसेच स्थानिक नागरिक श्री. आकाश मकवाणी यांनी गोसावी समुदायाबाबतची स्थानिक माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या क्षेत्र सर्वेक्षणामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक भूगोलाच्या अभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला व समाजातील दुर्लक्षित घटकांच्या समस्या समजून घेण्यास मदत झाली.

Scroll to Top