


अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अर्थशास्त्रीय रांगोळी स्पर्धा आज आयोजित करण्यात आल्या होत्या. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन IQAC प्रमुख डॉ.आदिनाथ गाडे सर यांनी केले. तर या कार्यक्रमास प्रोत्साहन डी.आर.माने महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. नंदकुमार कदम सर आणि कॅम्पस डायरेक्टर मा.डॉ. प्रवीण चौगुले सर यांचे लाभले. परीक्षक म्हणून प्रकाश आवटे सर आणि मोगणे सर यांनी काम केले. हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. अर्थशास्त्रीय रांगोळी स्पर्धेमध्ये आर्ट्स, कॉमर्स, आणि सायन्स या तिन्ही फॅकल्टी मधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.